Sadjananchi Riti
सद्जनांची रिती
सद्जनांची रिती, कधी वाटावी न भीती |
सद्जन प्रदृढ, भक्तीनिर्विकार-गूढ || १ ||
सद्जनांची वृत्ती, कधी नसावी कुवृत्ती |
सद्जन प्रदृढ, वृत्तीनिराकार-गूढ || २ ||
सद्जनांची कृती, कधी नव्हे स्वस्तुती |
सद्जन प्रदृढ, स्तुतीपरमार-गूढ || ३ ||
सेवादृढनिष्ठ | अंगी आलस्य त्याग |
चारू म्हणे सद्जन | करी आत्मयाग || ४ |||
चारूदत्त विश्लेषण : सद्जनांची रिती, वृत्ती, कृती, सेवा आदि तत्त्वांची अपेक्षा वर्णनबद्ध करून असणारी ही गोवी आचरणसाक्षातानुभवाचा उद्गमणीय सिद्धांत साधकासमोर प्रस्तुत करते. काव्यतज्ञांच्या दृष्ट्या काव्यरचनेचे निरिक्षण नोंदविले असता प्रस्तुत गोवी चार पदांमध्ये विभागून, त्यातून केवळ अखंड-ज्ञान-योग रसाचा आचरणात्मक भावाचा उदय अनुभवण्यांस साधकांस मिळतो. सद्जन हा जीवनाच्या प्रत्येक अंगाने सद्जनवृत्ती साधून असतो, असा भावार्थ प्रस्तुत अभंगात्म-गोवीपद्यातून आपणांस ज्ञात होईल. चतुर्थ पदामध्ये अंतीम " आत्मयाग " ही योगीक संकल्पना अर्थात् एकत्वाचेचं मूळ साक्षत्भूत सार होय, असा ज्ञानबोध व्यक्त केला आहे.
|| महाकवी विष्णुभक्त चारूदत्त ||
Dattashraya..
The Way of Akhand Gyan Yoga
दत्ताश्रय..
अखंड-ज्ञान-योग मार्ग
No comments:
Post a Comment