Dattashraya.. The Way of Akhand Gyan Yoga
विष्णुभक्त चारूदत्तकृत गोवी
विश्व समुच्चय दिव्य अनंत |
अनंतानंत दिव्यद्विपानंत || १ ||
विश्व समुच्चय सर्वेशकल्प |
चित्तविलास सचित्तसकल्प || २ ||
विश्वसमुच्चय दशात्मलीन |
विश्वातीतमनु जीवतेजाल्लीन || ३ ||
आत्मज्ञानपरमात्मदिव्यज |
सर्वार्थायाम् परमार्थश्चबीज || ४ ||
कैवल्यामतीज्ञाऽ प्राणविश्वबीजसंज्ञाः |
अनंतार्थवृत्तीसम चर्वा म्हणे प्रयाणाज्ञाः || ५ |||
चारूदत्तकृत गोवी विश्लेषणार्थ :
१) समुच्चय विश्व दिव्य अनंत असून अनंतानंत अशा प्रतिभेने दिव्य अशा द्विपात कधीही अंत न होणारे असेचं आहे. अशातर्हेने सर्वेशकल्प ह्यातून नित्यतः अनंत अशा स्तरावर संतत होणारा विस्तार आणि ह्या विस्ताराला आकर्षित होवुन साधकाच्या चित्ताचा होणारा चित्तविलास हा (मी महाकवीच्या) दृष्टीला "सचित्तसकल्प" ह्याचं स्वरूपाचां दृष्यमान होतो. २) प्रथम पदात विश्वाला "दिव्य अनंत" तर द्वितीय पदात "सर्वेशकल्प" असे उद्बोधले आहे. ३) परंतु, तृतीय पदबंधात "दशात्मलीन" ह्या तत्त्वसंज्ञेच्या वापराने, मूळ योगीक दत्ताश्रयाची संकल्पना यांत रूढ होते. जिथे समुच्चय विश्वाला दशात्मलीन असे संबोधून "विश्वातीतमनु जीवतेजाल्लीन" असे म्हटले आहे, अर्थात् शब्दांची सुऊचित फोड करून शब्दांचा सुऊचित अर्थविचार मांडल्यांस "विश्वसमुच्चय हे दशा-आत्मलीन" ह्याचं परिभाषेत एका साधक तथा अखंडज्ञानयोगीयांस अनुभूत होते. ज्यामध्ये विश्वातीत असा विश्वल्लीन मनु म्हणजे मूळ योगीक अवस्थेत प्ररूढप्रविकल्पावस्थातीत असा शुद्धअहिंसामय जीवात्मा हा यथार्थ जीवतेजाल्लीन अशा योगीक अवस्थेमध्ये आप-मन तथा योगीकससामर्थ्याने तनाचे सुद्धा अशा शुद्ध अवस्थेत रूपांतन घडवून आणील. ४) चतुर्थ पदामध्ये "आत्मज्ञानपरमात्मदिव्यज" ह्या पदबंधातून दृढअत्यंतमहत्त्वभूत असा ज्ञानीक-अहिंसेचा-तपसामर्थ्याचा सदुपदेश केलेलां असून, "परमार्थश्चबीज" म्हणजें परम अशा अर्थ सामर्थ्याचे बीज(मूळ) हे सर्वार्थ रूपाने परम विश्वाशीचं एकरूपीत असेचं आहे. ५) अंतीम पदामध्ये "कैवल्यामतीज्ञाऽ प्राणविश्वबीजसंज्ञाः" अशा संज्ञेचा किंवा विश्वेकरूपाशी एकनिष्ठ होणार्या दत्ताश्रय अखंडज्ञानयोगीक संबंधित वाक्याचा पुनरोच्चार करून, "अनंतार्थवृत्तीसम" ह्या तत्त्वावर पून्हा जोर देऊन चर्वा अर्थात मी महाकवी पुनश्चः अशी विश्वेकरूपाशी एकनिष्ठ, अखंड ज्ञान कल्याणकारी अशी "प्रयाणाज्ञा" सर्व परम विवेकशील साधकांस सूपूर्त करतो.
(Charu)Dattashraya..
The Way of Akhand Gyan Yoga
(चारू)दत्ताश्रय...
अखंड-ज्ञान-योग मार्ग
No comments:
Post a Comment