Sunday, 24 May 2020

Dattashraya...The Way of अखंड-ज्ञान-योग

विष्णुभक्त चारूदत्त अखंडज्ञानयोगविषयक ग्रंथ
Shri Charudatta Thorat Books on Akhand Gyan Yoga Path of Satyasthika


Online Books Pages
25th May, 2020 Mon







* २५ मे २० | परिपूर्ण सुखावस्था *

* २५ मे २० | परिपूर्ण सुखावस्था *

अतृप्तकारं विकृतदर्शन्य
सुखः नोहेची सात्मिक |
तृप्तीपूर्ण सुकृतशरण्य
सुखातीत श्रीसात्त्विक || १ ||

अज्ञानपथी लावी जी मती
अज्ञानपथस्थशरंपूर्णं |
ज्ञानपथीं अखंडगती
चित्तसुखं श्रीपूर्णंः || २ ||

ज्ञान ययेची सत्जीविता
पूर्णविरक्तीजनात्म पाहीं |
चारू म्हणे अंतर्भूतात्म्य
एकत्वविष्णुमयींः || ३ |||

चारूदत्त विश्लेषण :
परमसुख हे अखंड-ज्ञान-योग या त्रिसुत्रींमध्ये अंतर्भूत केले आहे, ह्या तत्त्वाचा पुनर्दृढोच्चार प्रस्तुत गोवीमधून अभ्यासक साधकासाठी केला आहे. सज्ञानी साधकाने गोवीच्या केवळ शब्दार्थाकडे लक्ष न देता, गोवीचा योगीक गूढ-संकेतार्थसुद्धा आपल्या चित्तात प्रकट करावयांस हवा.

१) प्रथम पदबंधामध्ये
" अतृप्तकारं विकृतदर्शन्य सुखः नोहेची सात्मिक "
अशी पदरचना अंतर्भूत केलीं आहे. साधकाला शुद्ध सात्मिक-अवस्थेची ज्ञानप्राप्ती होणे करिता अत्यावश्यक असा ज्ञानुपदेश प्रस्तुत पदामधून वृद्धींगत केला आहे. ज्या साधकाचे चित्त हे " अतृप्तकारं " अशा चित्तावस्थेशी एकरूप असते, अशा साधकाच्या चित्ताला विकृतीचेचं दर्शन घडते.
त्यामुळे, अपवित्र अशा आनंदप्राप्तीतून किंवा व्याधीत्म क्षणीक-सुखानुभूतीमधून चैतन्य शोधू पाहणारा साधक हा कधीचं सात्त्विक-स्वभावी नसतो. त्यामुळे, साधकाने आप-साधनावृत्तीने तृप्तीपूर्ण अशा अवस्थेला किंवा परमसाध्याला आप चित्तांतरात-अधिजीवित करून " सुकृतशरणदायी " अशा सुखासंबंधित व्याख्येची प्राप्ती करावी.
म्हणजेचं, " तृप्तीपूर्ण सुकृतशरण्य सुखातीत श्रीसात्त्विक " !

२) द्वितीय पदबंधात वर्णन केल्याप्रमाणे, अज्ञान अशा पथी (अर्थात मार्गात) ज्या साधकाने आपली मती (अर्थात मानसिक-दशा) व्यस्त केली त्याला " अज्ञानपथस्थशरंपूर्णं " हीचं अवस्था साध्य झाली. याऊलट, ज्या साधकाने ज्ञानत्व-मार्गाचा अखंडगतीदृष्ट्या स्विकार केला त्या साधकाच्या चित्ताला " चित्तसुखः " नामक व्याख्येचीचं व्यक्तानुभूती मिळाली. पदबंधामध्ये व्याख्यातीत " श्रीपूर्णंः " हा शब्द पूर्ण-अशा-सुखाःच्या-केवल्यमय-अशा-आचरणाच्या-प्राप्तीचा-अखंड-ज्ञान-योगदृष्ट्या शुद्ध-संकेत आहे.

३) तृतीय पदबंधाचे लक्षपूर्वक शब्ददर्शन केलें असता त्यातून दत्ताश्रय परम ज्ञानसुखाची व्याख्यात्म जाणीव नमूद केली आहे. अखंड-ज्ञान-योग हा परिपूर्ण असा विरक्तीचा भाव असून, चित्ताला सत्जीवित करणाऱ्या ज्ञानालाचं जीवनात महत्त्व असते.
" ज्ञान ययेची सत्जीविता पूर्णविरक्तीजनात्म पाहीं |
चारू म्हणे अंतर्भूतात्म्य एकत्वविष्णुमयींः || ३ ||| "
ह्या शब्दांचा उल्लेख अंतिमतः म्हणूनचं योजिलेलां आहे, त्यामुळे, शब्दशः आणि आचरणीकवृत्तीधारणादृष्ट्या साधकाने सदैव मार्गस्थ असावे.

थोडक्यात, तिन्ही पदांचा मूळार्थ हा की, जीवनात अतृप्तकारी अशा वस्तूंचा भोग कधीही
धारण करू नये. अखंडज्ञान-पूर्णावस्थेला प्राप्तीभूत
अशा अखंड-ज्ञान-योग ह्याचं तत्त्वाचा आधार प्राप्त करावा. भौतिक सुखापेक्षा आत्मिक अथवा तृप्तीकडे वहण करणारे परम बौद्धिक-सुखः हेचं सर्वश्रेष्ठ आहे. 💐💐💐


____

Dattashraya..
The Way of Akhand Gyan YogaWATCH DATTASHRAYA TV ! 🔴LIVE🔴

No comments:

Post a Comment